Anna ashtekar 92

92-  अण्णा अष्टेकर पुर्णतः काल्पनिक, ® at fwa 70121130, © मकरंद बेहेरे…….

…….मी अण्णाबद्दल करत असलेल्या लिखाणाची कुरकुर अण्णाला लागली होती, आणि अण्णाने ते लिखाण त्यांच्या मराठी चित्रपट सृष्टीतील एका दिग्दर्शका  मित्राला ऐकवलं की ज्याच्या नावावर दिग्दर्शक म्हणून “स्वर गेले विरूनी” आणि “सारे झोपले आकाश” सारखे दोन हिट चित्रपट होते पण तरीही तो अजून बेस्ट बसने आणि भारतीय रेल्वेने बर्याच वेळा विना तिकीट प्रवास करायचा…….

…….तर अण्णाला तो स्वत: म्हणाला की मला लेखकाला भेटायचय पण अशा ठिकाणी भेटू की जिथे माहोल बनेल मूड क्रिएट होईल, आम्हाला अर्थातच कळलं, स्थळ अर्थातच “कडूशाला…….!”

…….तर ठरल्याप्रमाणे आम्ही “फिल्म सिटी रोड” वरील एका मध्यम दर्जाच्या कडूशालेत बसलो, कारण ती जागा दिग्दर्शक साहेबांच्या घरापासून जरा जवळ होती, तर बैठक बरोब्बर संध्याकाळी सात वाजता सुरू झाली, साहेबांचा आवडता ब्रॅंड अर्थातच “खंड्या” म्हणजेच डाॅक्टर मल्यांच्या काढा, आम्ही पित नव्हतो फक्त चकना खात होतो, बर्फातले पनीर, खारे शेंगदाणे, लसूण आणि बटर मध्ये तळलेले काबुली चणे, मसाला पापड, चीज गार्लिक ब्रेड इ. सुरूवात  इंडस्ट्रीतील इकडल्या तिकडल्या गप्पांनी झाली, हा काय करतो, ती काय करते, कोणाचं कोणा बरोबर चालू आहे कोण हाजी हाजी करून कशी काम मिळवतो, अनेक विषय, पण जसा काढा शरीरात मुरू लागला, तसा साहेबांच्यात भिनलेले डाॅक्टर मल्यां बोलू लागले आणि दिग्दर्शक साहेबांनी स्क्रिनप्ले, शाॅट डिव्हीजन सकट सगळा “अण्णा अष्टेकर” आम्हाला ऐकवला, कसं कधी काय करता येईल, स्केड्यूल कसं ठेवायचं, ते अगदी प्रोड्यूसर शोधण्यापर्यंत सगळं काही साहेब करणार होते कारण ते लिखाणाच्या आणि अण्णा अष्टेकर दोघांच्याही प्रेमात होते, आम्हा दोघांसमोर एक आशावादी चित्र निर्माण झालं, संध्याकाळी सात वाजता बसलेले आम्ही, बार बंद होताना रात्री दोन वाजता उठलो, तो पर्यंत साहेबांनी १४ बाटल्या रिचवल्या होत्या एकूण चकना आणि काढा मिळून काही हजारांच्या बिल झालं ते अण्णानेच दिलं,  बाहेर पडलो पानांच्या गादीवर “चार चौकोन” आणि विड्याच्या पानाची दक्षिणा साहेबांच्या हातावर ठेवली, निघताना साहेबांनी पॅंटेचे फाटके खिसे दाखवत रात्रीच्या मिटरसकट रिक्षाचं भाडं आणि हातखर्चाला काही पैसे अण्णाकडूनच घेतले आणि साहेब रिक्षाने  पसार झाले, 

……साहेब इंडस्ट्रीतील मुरलेली व्यक्ती होती की ज्यांनी स्वत:चे फाटके खिसे असूनही त्यांनी आमचं स्वप्न असलेला काही कोटीचा चित्रपट जो आम्ही मोठ्या पडद्यावर पाहू इच्छित होतो तो आम्हालाच त्यांनी आमच्या पैशांनी सात तासांत दारूच्या टेबलावर निर्माण करून दाखवला, की ज्यांच्या खिशात कडुशालेच्या बाहेर आल्यावर एक दमडीही नव्हती,

……त्यांचा हा कफल्लकपणा माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून गेला…….

…….आणि या काल्पनिक चित्रपटाचा सगळा त्रास अण्णाने माझ्यासाठी सहन केला……

Advertisements

anna ashtekar 89

89- अण्णा अष्टेकर (पुर्णतः काल्पनिक), ® at fwa

71028022, © मकरंद बेहेरे,

……. आणि घडले विश्वा पलिकडले……

…….अण्णा माझ्यासाठी एक अनाकलनीय, गुढ बनत चालला होता, आणि त्याची प्रचिती मला नुकत्याच झालेल्या गुरूपौर्णिमेला आली…….

…… अण्णा ज्या गुरूंकडे तबला शिकायला जात होता, ते आता अण्णा बरोबर, मोबाईलवर संपर्कात असतात, त्यांची मधून मधून बोलाचाल चालू असते, अगदी कौटुंबिक जीवनापासून ते बरेच विषय निघत असतात,  गुरूंच्या एकंदर बोलण्यावरून त्यांच एकंदर सगळं व्यवस्थित असेल असं अण्णाला वाटत होतं, पण एक वर्षापूर्वी कधीतरी त्यांच्या बोलण्यातून अण्णाला कळलं की त्यांच्या मुलाला प्रार्थमिक अवस्थेतला कर्करोग आहे, जो औषधांना, उपायांना जुमानत नव्हता, जे कधी अण्णाचे गुरू त्या अगोदर बोलले नव्हते आणि अगदी आमच्या पहिल्या भेटीतही, अण्णा त्यांना म्हणाला की त्याला माझ्याकडे घेऊन या, मला त्याला भेटायचय, तर ठरल्याप्रमाणे अण्णाचे गुरू त्यांच्या मुलाला अण्णाकडे घेऊन आले, गुरूंना वाटलं अण्णाला त्यांच्या मुलाला असंच भेटायचं असेल, पाहूणचार झाला अण्णाने त्याच्या आजाराच स्वरूप जाणून घेतलं आणि बोलता बोलता त्याचा हात हस्तांदोलनासाठी हातात घेतला आणि गुरूंचा मुलगा कळवळला आणि बेशुद्ध पडला, क्षणभर गुरूंना काही कळलच नाही आणि अण्णाने ही तसंच भासवलं आणि अण्णाचे गुरूही अचानक भंजाळल्यासारखं करायला लागले, आणि थोड्याच वेळात ते ही चक्कर येऊन जमीनीवर पडले, हे सगळं माझ्या डोळ्यासमोर, माझ्या घरी होत होतं, आणि दोघे ही दुसर्या दिवशी आगेमागे उठले, दोघांनाही असंच वाटतं होतं की ते दोघे आत्ताच झोपेतून जागे झालेत बाकी त्यांना काही आठवतंच नव्हतं, जणू काही घडलच नाही, आणि अण्णानेही त्यांना नेमकं काय झालय त्याची टोटल लागू दिली नाही, ते जेव्हा निघाले तेव्हा अण्णा त्यांना म्हणाला उपचार सुरू ठेवा डाॅक्टरचा सतत फाॅलोअप घेत राहा, आणि मला कळवत राहा, पण अण्णा दर महिन्याला मुलाची चौकशी करायचा आणि त्यातून त्याला मुलाच्या तब्येतीची कल्पना यायची, आणि गुरूंना पण आश्चर्य वाटायला लागलं की उपायांना न जुमानणारा आजार अचानक, उपायांना साथ कशी देऊ लागला, मुलाचा माईंड सेट कसा बदलू लागला हे सगळं हळूहळू घडत होतं कारण अण्णा ते दोघेही गेल्यावर मला म्हणाला, “मी काही देव नाही, मला जमतंय तेवढं मी केलयं, बघुया काय होतंय ते”, पण गुरूंना एकंदर त्या दिवशी काय घडलं असावं हे कळलं असावं, कारणं…….

……. गुरू पौर्णिमेला अण्णाचे गुरू आले आणि धाय मोकलून रडले आणि त्यांनी अण्णाला काही कल्पना येण्या अगोदरच अक्षरशः साष्टांग नमस्कार घातला, कारण आदल्या दिवशीच त्यांच्या मुलाचा रिपोर्ट आला होता आणि गुरूंच्या मुलाचा कर्करोग पुर्णतः बरा झाला होता, 

…….आणि अण्णा त्याच्याच गुरूंच्या कधीकाळच्या वक्तव्यानुसार आज गुरुच्या एक पाऊल पुढे होता…….

anna ashtekar 83

83 –अण्णा अष्टेकर, (पुर्णतः काल्पनिक), ® at fwa  71026022, © मकरंद बेहेरे,

……. आणि त्यामुळे अण्णाला, पश्चात्ताप झाला…….

…….तुम्हाला माहित्येय डाॅक्टर  दारुवाला उर्फ अशिष पुरोहित, दारू पिऊन भविष्य सांगतो, तर अण्णा आज मित्रत्वाच्या नात्याने एका नवविवाहित जोडप्याला डाॅक्टर दारूवालाकडे घेऊन गेला, अण्णाने त्याला जोडप्याला बरंच खोदून विचारलं की काय प्राॅब्लेम्स आहेत पण पहिल्या संवादापासून जेव्हा त्या जोडप्याने अण्णाला गळ घातली की आम्हाला कुणाही निष्णात ज्योतिषाशी भेट घालून दे, तेव्हापासून ते जोडप अण्णाला काही सांगायला तयार नव्हतं, की आम्ही जे काही सांगायचय ते त्या ज्योतिषाला सांगू, पण सगळं विसरून अण्णा दोघांनाही आशिष पुरोहितकडे घेऊन गेला…….नेहमीच्या मधुशालेत…….

……. दोघेही आय.टी  सेक्टरमध्ये, मुलाला वार्षिक २० लाखाच पॅकेज तर मुलीला, १५ लाखाच, दोघंही आठवड्यातून त्यांच्या नोकरीमुळे समोरासमोर खूप कमी येतात, तर त्यांचा प्रश्न होता संतती बाबत, खरं तर तिला मुल दत्तक हवं होतं पण मुलाने हट्ट धरला स्वतःच मुल हवं, मग तिने अट घातली “चाचणी नलिका अर्भकाची” ती त्याने मान्य केली कारण तिला जीवापेक्षाही महत्वाच्या झालेल्या सोकाॅल्ड नोकरी आणि पगाराच्या हव्यासामुळे प्रसुतीपर्यंत ९ महिने आणि नंतरचे संगोपनाचे सहा महिने वेळ वाया घालवणं शक्य नव्हतं आणि प्रसुतीवेदना सहन करणं……. ही भुमिका तिने पुरोहितची तार लागेपर्यंत स्पष्ट केली…….

……डाॅक्टर दारूवाला एक एक ग्लास रिचवत त्याच्या लेव्हलपर्यंत येत होता कारण त्याला पर्याय नव्हता, आणि ते दोघेही पित होते, कारण आज बहुतांश मराठी माणसाची संस्कृती दारूमय झाली आहे, आणि अण्णा, नुसता चकना खात होता…….

…….तर दारूवालाची लेव्हल आली होती आणि त्याने विचारलं की प्रश्न काय आहे? तसं मुलगी उत्तरली की आम्हाला वेळेची आणि ग्रह तार्यांची गोळाबेरीज करून असं बाळ जन्माला घालायचय की ते आयुष्यभर सर्वार्थाने सुखी असेल, थोडक्यात तीला आधी कुंडली रचून मग त्या कुंडलीनुसार बाळ जन्माला घालायचं होतं, थोडक्यात त्या अनभिज्ञ विश्वविधात्याचं कामं तिने अण्णाला सांगीतलं होतं…….

…….काही मोजक्या जगप्रसिद्ध रेडिओलाॅजिस्ट पैकी एक  डाॅक्टर दारुवाला जागेवरून उठला त्याने, त्या दोघांना भर मधुशालेत साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाला मी डाॅक्टर असलो तरी आस्तिक आहे आणि त्यामुळे मी निसर्गाच्या चक्रात ढवळाढवळ करत नाही आणि निसर्गाविरुद्ध कसलं ही कामं करत नाही…….!

anna ashtekar 09

09- अण्णा अष्टेकर, (पुर्णतः काल्पनिक), ® at fwa    ४१०२४०११, © मकरंद बेहेरे- अण्णा आणि इतर मित्रांबरोबर हरिहरेश्वरला पिकनिकला आलो आणि नोस्ताल्जिक झालो. आज जग किती जवळ आलय नाही?फेसबुकवर अमेरिकेतल्या भावाबरोबर video chat करता येतं, त्याला whats app वर जगाच्या एका कोपऱ्यातून हाता एवढ्या डिव्हाइसवरून दुसऱ्या कोपऱ्यात मेसेज पाठवता येतो. तो ही एका सेकंदात पोहोचतोपण आज पासून ३० वर्ष अगोदर स्थिती तशी नव्हती ना! हे तुम्हाला ही माहीत असेल, ट्रंकाॅलतार या सारखी किती तरी साधन माणसाच्या मदतीला धावून येत होतीअवघ्या पंचक्रोशीत एक टेलीफोन असायचा आणि तो ही कोणाच्या तरी घरी आणि त्यावरून फोन करण्यासाठी तीन रुपये मोजावे लागायचे. चाळीत तार वाला तार घेऊन आला की चाळीतल्या बायकांच्या डोळ्याला काही न जाणून घेता पदर लागलेला असायचा……. 

 ही गोष्ट आहे चाळीतल्या अष्टेकरांच्या अक्का शेवटचे श्वास घेत होत्या तेव्हाचीशुध्द होती पण काही खर नव्हतं स्मरणशक्ती आधी पासूनच गेली होतीसारखी आठवण करून द्यावी लागायची९०व्या वर्षी जरजर झालेल्या देहात मुक्ती साठी आसुसलेला आत्मा कशात गुंतून राहिला होता त्यालाच माहीत, सगळी चाळ अष्टेकरांच्या घराकडे डोळे लावून होतीअक्का जरी आमच्या चाळीत राहात होत्या तरी त्यांच बरचस बिऱ्हाड कोकणात होत त्यांना चार ही मुलगे, मोठा आमच्या चाळीत असायचा बाकीचे तिघे गावाकडे, त्यातल्या धाकट्याच्या, धाकल्या यशवंताला लग्नाला दहा वर्ष होऊन ही मुल होत नव्हत ही म्हातारीला खंत, बाकी तिघे ही आबादी आबाद होतेघराण्याला वारसदिवाळीला पणती सगळ सगळ काही होतं, त्या साठी म्हणुन म्हातारीने शंकराच्या देवळाचा उंबरा किती झिजवला नसेल देव जाणे, सोळा सोमवार पासून जितकी व्रत वैकल्य करता येईल तितकी ती करतच होती पण माणसाचा जीव कुठे गुंतला असेल आणि कोणत्या गोष्टीसाठी, ते सांगता येत नाही. पूर्वीच्या काळी मुलं जगत नव्हती त्यामुळे चाळीत काही कुटुंबात भारतीय क्रिकेटची टीम तयार होईल इतकी पैदास असायचीअसो, तर म्हातारीचा जीव कशात गुंतला होता ते पिंडाला शिवणाऱ्या कावळ्यालाच एखादवेळ माहीत असावंचाळीच वातावरण हे मुळातच कौटुंबिक असल्या मुळे एखादा देशातला मोठा राजकीय नेता गेल्यावर देशावर जशी सुतकी काळा येते तशी आमच्या चाळीवर होती, म्हातारी आत्ता मरत्ये कि नंतर ही टांगती तलवा, तिच्या समवयस्क मैत्रिणीज्या काही वर्षांनी तिला भेटायला जाणार होत्या तिच्या आजू बाजुला जमल्या होत्यालहान मुलांना दंगामस्ती करता येत नव्हती म्हणुन ती कदाचित तिच्या नावाने चरफडत असतील मनातल्या मनात, बाकीची मंडळी काही ऑफिसला निघालेली काही पोहोचलेली,आपले बेत रद्द करूनहाफ डे टाकून घरी परतलेली कारण डॉक्टर दोन तासा पूर्वी येऊन कोऱ्यामीनचे इंजेक्शन सजेस्ट करून गेले होते जे ऐन वेळेवरती कधीच मिळत नाही…………..आणि तितक्यात तार आलीआधीच सुतकी अवकळा असलेल्या वेळी आता आणखी काय ऐकायला मिळतय असं म्हणत काही पदर परत डोळ्याशी गेलेती तार नेमकी आली ती अष्टेकरांच्याच घरीसगळ्या चाळीची धाकधूक वाढायला लागली, आणि म्हातारीचा मोठा आक्काच्या कानात काहीतरी कुजबुजला तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या जरा हसल्या आणि आमचा अण्णा यशवंताच्या घरी जन्माला आला होता, मोठ्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, म्हातारी का थांबली होती ते तेव्हा कळल कारण आमचा अण्णा कुणी ही त्याच्या साठी थांबाव असाच होता आणि आहे……….

anna ashtekar 85

85– अण्णा अष्टेकर (पुर्णतः काल्पनिक), ® at fwa 71027060, © मकरंद बेहेरे, 

……. अण्णा आजकाल जे काही अनाकलनीय प्रकार करतो त्या बद्दल बरेच दिवस मला प्रश्न सतावतोय, हे सगळं अण्णा करतो कसं? अगदी पुण्याई नगरकरचा किस्सा, त्या न्युकमर संगीतकाराचा किस्सा, २६ जुलैचा किस्सा, कारण मी जसं अण्णाला पहातोय तसं अण्णाला अमानवीय किंवा अतिंद्रीय शक्ती, सिध्दी प्राप्त नव्हत्या, की फार पुर्वी असे टोटल न लागणारे खेळ त्याने करून दाखवले नव्हते, पण आज मी त्याला माझ्या मनात खदखदत असलेल्या प्रश्नाच शंकेच उत्तर न विचारताच त्याने मला देऊन टाकलं…….

…….आज माझ्या स्वरचित, आणि संगीतबध्द केलेल्या रचनांचा वर्षाला होणार्या बर्याच कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम झाला, त्यात काही नवल नाही, ते होतच असतात, असो तर, त्या कार्यक्रमाला काही गजलवासींचा गृप आला होता आणि तो हुल्लडबाजी करत होता, अण्णा विंगेतच होता, अण्णाने मध्येच येऊन कार्यक्रम थांबवला आणि त्यांना “प्राॅब्लेम काय आहे?” विचारलं, तर त्यांच्यापैकी एक जण उठला आणि म्हणाला, “आम्ही मकरंद बेहेरेंना गीतकार आणि संगीतकार मानायलाच तयार नाही आहोत!”, अण्णा त्यावर म्हणाला “ठीक आहे हे मी ही मान्य करतो पण माझ्यासाठी एक कराल, फक्त एकच, प्रत्येकाने काही वेळासाठी बाजुला बसलेल्या व्यक्तीच्या कानावर आपला हात ठेवाल? फक्त काही मिनिटांसाठी, आणि जवळ जवळ प्रत्येकाने तशी कृती केली आणि काय आश्चर्य, काही वेळातच माझ्या आरोह अल्बममधील प्रत्येक जण “शेज ही बोलते” हे गाणं मोठ्याने गुणगुणू लागला, कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या. हातातून तेच गाणं ऐकु येत होतं, आणि त्यामुळे झालं काय की जे निख्खळ माझ्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आले होते त्यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात करून सभागृह दणाणून सोडलं, त्यावर अण्णा म्हणाला, “तुम्ही कितीही नाही म्हणा, पण आज तुम्हालाच प्रचिती आली असेल की मकरंद तुमच्यात किती भिनलाय ते!”

कार्यक्रम संपल्यावर आम्ही जेव्हा टॅक्सीत बसलो तेव्हा अण्णा म्हणाला “मला मध्यंतरी झालेल्या अॅक्सिडंटची ही सगळी कृपा!”

anna ashtekar 86

86– अण्णा अष्टेकर (पुर्णतः काल्पनिक), ® at fwa 71027070, © मकरंद बेहेरे,

……. ” आॅल आऊट फाॅर नो लाॅस!” अण्णाने हे उत्तर दिलं आणि विचारलेल्या प्रश्नावर अण्णाची फजीती होईल असं वाटलेल्या त्या टवाळाचा थोबडा उतरला, आणि बाकीचे मजा बघायला जमलेले त्या टवाळालाच हासायला लागले…….

……. प्रत्येक चाळीत जशी एखादी काकी आणि मामी असते तसाच एखादा टवाळही, नाही टवाळांचं संपूर्णच्या संपूर्ण कुटुंबच्या कुटुंबही असतं, आणि कुत्सितपणा, कुचकेपणा त्यांच्या नसानसात भरलेला असतो, बाकी शष्प काही नसेल त्यांच्याकडे, पण इतरांची टिंगलटवाळी करण्यात हातखंडा असतो, ते संधीच शोधत आसतात आपल्याला एखाद्याची टर कशी उडवता येईल आणि ती झालेली मजा, फजीती महिनोन्महिने रवंथ करण्यासाठी त्यांच्याच समान लायकीच्या कुटुंबांचे त्यांच्या बरोबर कट्टे भरत असतात.

……. तर ही महादेव निवासमधली गोष्ट आहे, एकदा अण्णाच्या घराला कुलूप होतं, बाकीचे घरातले कुठेना कुठे गेले असावेत, अण्णा आला आणि शर्टाच्या आणि पॅंटेच्या खिशात चावी शोधू लागला, पण चावी काही मिळेना, नंतर त्याच्या लक्षात आलं की, त्याची किल्ली घरात राहिल्येय आणि तो बाहेर, त्याची ही धडपड बघून एखादा त्याच्या मदतीला धावला असता, पण तो कुटाळ शैतानी डोक्याचा आणि त्याच्या बरोबरचे, अण्णांचा हात बरोब्बर पॅंटेच्या खिशात गेल्यावर त्याने प्रश्न विचारला, बरं जगात त्यावेळी कुठेही कसलीही मॅच चालू नव्हती कि चाळीच्या मैदानात, “काय अण्णा स्कोअर काय झाला?” अण्णा पण हजरजबाबी त्याने वरील उत्तर दिलं, पण एवढी फजीती होऊनही तो टवाळ हार मानायला तयार नाही, तो म्हणाला “हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही अण्णा!” पण अण्णाही त्याच्यापेक्षा सवाई अण्णाने त्यानंतर जे उत्तर दिलं ते ऐकून फिदीफिदी हसणारे बाकीचेही त्या कुटाळासकट पसार झाले, जे उत्तर मी तुम्हाला इथे सांगू शकत नाही…….