anna ashtekar 33

33- अण्णा अष्टेकर, [पुर्णत: काल्पनिक], 61026092, ® at fwa, © मकरंद बेहेरे,- पुण्याई नगरकर आमच्या बिल्डींगमधे राहणारी, 16 वर्षाची, आज तिचं पहिलं आरंगेत्रम तिने उत्तम आणि उत्स्फूर्तरित्या सादर केलं आणि अण्णाचे विशेष आभार मानले, पण आठवडाभरापुर्वी हे आम्हाला शक्य वाटलं नव्हतं, कारण ती बाथरूममध्ये पाय घसरून पडली होती आणि त्यामुळे तिचा पाय मुरगळून तिच्या पायाला सूज आली होती, पुण्याईचा बाप अप्पा आमचा मित्र तिला आजकालच्या जमान्यातल्या फँमिली डाँक्टरकडे घेऊन गेला, त्या डॉक्टरने त्याच्या सि. यु. टी रिवाजानुसार सगळीकडे फिरवला, निष्पन्न मात्र काही झालं नाही साधा हेअर क्रॅकही आणि भरमसाठ बिल होऊन हातात मात्र फक्त पेन किलर, सूज लवकर उतरायला हवी होती वेदना थांबायला हवी होती, आणि पाय ठणठणीत बरा व्हायला पाहिजे होता आणि पुण्याई सारखी रडत होती, 

     दुसर्या दिवशी त्यांच आॅफिस सुटताना, अण्णाचा मला फोन बोलता बोलता पुण्याईच्या आरंगेत्रमचा विषय निघाला, त्यालाही अप्पाने बोलावणं केलं होतं, मला म्हणाला मी कुटुंबाला घेऊन रहायला येतोय आपण सगळे जाऊया, मी म्हणालो की एखादवेळ शो होणार नाही, त्याने विचारले ‘का?”, मी झालेला प्रकार सांगितला, नंतर इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या आणि संवाद बंद झाला, आणि अर्ध्या तासात स्वारी दारात हजर, म्हणाला चल माझ्याबरोबर अप्पाकडे, आम्ही गेलो, अप्पाला म्हणाला मला पुण्याईला भेटायचय , आम्ही आत गेलो जिथे पुण्याई सोफ्यावर बसली होती अण्णा तिच्यासमोर खुर्ची घेऊन बसला तिला हाय हॅलो केलं ती ही अण्णाला चांगली ओळखत होती, त्यामुळे अण्णाने त्याच्या दोन पायांच्यामधे तिचा मुरगळलेला पाय ठेवायला सांगीतला, आणि म्हणाला माझ्या पायाला अजिबात स्पर्श करायचा नाही, सुमारे पंधरा मिनिटे झाली तो तिच्यासमोर बसून होता अण्णान काय केलं माहित नाही पण त्या पंधरा मिनिटात तिच्या पायाची सूज उतरली आणि वेदनाही थांबल्या, पुण्याईचा विश्वासच बसेना, ती तो चमत्कार बघून एवढी रडली की बोलता बोलता सोय नाही, निघताना अण्णा फक्त एवढंच म्हणाला, बेटा आता तुझा शो होईपर्यंत मी येत जाईन! आणि आठवड्याभरात पुण्याई ठणठणीत बरी झाली!
     आज तिचा शो झाल्यावर तीने काका अशी जोरात हाक मारली आणि ती अण्णाच्या पाया पडली, आणि तिचे डोळे पुन्हा पाणावले होते.
      पण आज मला एक कळलं, अण्णा मला अजून अनभिज्ञ होता!

Advertisements

anna ashtekar 36

36- अण्णा अष्टेकर, [पुर्णत: काल्पनिक] 61027070, ® at fwa, © मकरंद बेहेरे, हा अण्णाचा एकदम वायल्या किस्सा, अण्णा बरेच दिवस माझ्याकडे फिरकला नव्हता, म्हणून मी त्याच्याकडे आॅफीसमध्ये गेलो होतो काल  संध्याकाळी ५ वाजता आॅफीसमध्ये सुटण्या अगोदर अर्धा तास,  तो त्याचं काम संपवतच होता, इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या, म्हणाला अरे हल्ली दर २ र्या आणि ४ थ्या शनिवारी बदलापुरच्या वॄध्दाश्रमात जाऊन थोडी सेवा करतो त्यामुळे तुझ्याकडे येता येत नाही, मी त्याला नमस्कार केला, मधल्या मध्ये त्याचं काम उरकणं चालुच होतं. पण आज तो थोडा वैतागलेला दिसत होता, मी त्याला टोकलं पण त्याने तसं मला भासु दिलं नाही, पण काही मिनिटातच त्याच्या वैतागाचं कारण कळलं.

      आजकाल मोबाईल प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे, दुधारी वस्तू आहे जसे चांगलेही परीणाम आहेत तसे वाईटही परीणाम आहेत, आणि काही वेळेस अनैच्छिक डोकेदुखी. आपल्या प्रत्येकाला सहन करावी लागते कधी कधी. तशी अण्णाही सहन करत होता काल दिवसभर, आणि त्याच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला असावा.
      आजकाल आपल्या प्रत्येकाला मोबाईल कंपन्यांना, क्रेडिट कार्ड, एन.जी.ओज् ,क्लब मेंबर शीपचे  आणि इतर अनेक अनैच्छिक फोन येतात, त्यांना टॅकल करताना एक तर आपल्याला नाकीनऊ येते, नाहीतर आपण त्यांना सरळ नाही तरी म्हणतो, पण अण्णाने जे उत्तर दिलं ते या दुखण्यावरचा रामबाण उपाय होता.
     काल त्याला असेच एका क्लब मेंबर शीपचे फोन येत होते, त्याने एकदा निक्षून नाही सांगीतलं तरी ती बालिका दर दोन तासांनी अण्णाला सतावत होती आणि एक प्रश्न आवर्जून विचारत होती,”सर आप बिझनेस क्या करते है?” अण्णा वैतागलेलाच होता, आणि परत त्या बायजेचा माझ्यासमोर  फोन आला, ती तीच पालुपद ऐकवून अण्णाला घोळात घेऊ लागली, आणि परत तोच प्रश्न “सर आप बिझनेस क्या करते है?” अण्णाने 
तीला जे उत्तर दिलं ते ऐकून तीने दुसर्या सेकंदाला फोन ठेवून दिला, 
“मॅडम मै ना, मै लडकिया सप्लाय करने का बिझनेस करता हुँ!”
……”साल एकतर सामान्यांना जगणं झालंय मुश्कील, आणि यांना सहन करायला कोणी सांगितलय!”

Anna ashtekar 44

44- अण्णा अष्टेकर, (पुर्णत: काल्पनिक),  © मकरंद बेहेरे, ® at fwa, ६१०२८०९२ –  काही शब्द , काही म्हणी, काही वाक् प्रकार हे काळानुरुप चालणारे असतात! आणि काल त्याचा प्रत्यय आला…..

अण्णा हल्ली दर दुसर्या आणि चौथ्या शनिवारी बदलापुरच्या वृध्दाश्रमात जाऊन सेवा करत असतो हे आपल्याला माहीत झालं आहे, तर मी ही  ठरवलं की अण्णा बरोबर जाऊन थोडासा खारीचा वाटा म्हणून मदत करावी, म्हणून आठवडा भर आधी आम्ही प्रोग्राम ठरवला की कुठे कधी कसं भेटायचं, वृध्दाश्रमात किती वेळ सेवा करायची, परत कधी निघायचं ई. या वेळी अण्णा बरोबर पुण्यावरुन आणखी कोणी तरी येणार होते. ती व्यक्ती काही महिन्याने अमेरिकेला जाणार होती आणि त्या व्यक्तीची बायको त्या व्यकतीचे कचर्याचे डबे सांभाळायला तयार नव्हती, त्यामुळे ती व्यक्ती तो वृध्दाश्रम बघायला येत होती, अण्णामुळ तो वृध्दाश्रम त्या व्यक्तीला विश्वासातला वाटला असावा, पण त्या व्यक्तीची वृध्दाश्रमाची भेट अण्णा बरेच दिवस टोलवत होता, ते का? ते नंतर कळलं….
      तर ठरवल्याप्रमाणे अण्णा पुण्यावरून आला, आम्ही बदलापुर स्टेशनवर ठरलेल्या वेळी भेटलो आणि वृध्दाश्रमाच्या दिशेने मार्गक्रमण केले, अण्णा बरोबर ती पुण्याची व्यक्ती ही होती, आम्ही वृध्दाश्रमात गेलो, अण्णा नेहमीच्या रिवाजानुसार जणू काही नेमुन दिल्याप्रमाणे सगळी कामं करत होता, कुणाला अन्न भरव, कुणाला हाताला धरून फिरवून आण, कुणाला पेपर वाचून दाखव, कुणाला पाॅटी दे इ, आणि मी त्याचं कार्य, त्याची मदत त्याचे शरणमुल्य बघून थक्क होत होतो. कि हा माणुस किती निरिच्छ, किती अनासक्त असावा, याला षड्रिपू कधी शिवलेच नसतील…..आणि त्या विरुद्ध ती पुण्याची व्यक्ती, स्वच्छतेपासून ते वृध्दांचा सांभाळ करण्यासाठी देण्यात येणार्या फी बाबत कीस पाडत होती. आणि तेवढ्यात यस्मिन वाकणकर आली.
     यस्मिन वाकणकर, अण्णाला चांगली ओळखत होती, ती अण्णापेक्षा जुनी सेवेकरी होती, वृध्दाश्रमात मदतीला येणार्यांना प्रत्येकाची खबरबात असायची, आणि म्हणूनच अण्णाने पुण्याच्या त्या व्यक्तीची भेट लांबवली होती, यस्मिनने व्ही. आर. एस घेतली होती, ती एल.आय.सीत नोकरीला होती. आणि ती सुध्दा अण्णासारखी, दुसर्या व चौथ्या शनिवारी वृध्दाश्रमात सेवेसाठी यायची, आणि आज जेवण झाल्यावर ती एका वृध्द जोडप्याला घरी घेऊन जात होती, अण्णा बरोबर आलेल्या व्यक्तीने तिला विचारलं हे तुमचे आई वडिल का? तर यस्मिन म्हणाली “हे आजी आजोबा माझे कुणी नाहीत आणि या आजी आजोबांना जगात कोणी वाली नाही म्हणून मी या आजी आजोबांना दत्तक घेतलय, आणि मी यांचा पोटच्या मुली प्रमाणे सांभाळ करेन, कारण माझा सांभाळ अनाथाश्रमात झालाय, त्यामुळे मला माहितेय अनाथ असण्याचे दु:ख काय असतं!”, तिने कागदपत्रांची औपचारिकता, पुर्तता पूर्ण केली आणि तिने आणलेल्या गाडीतून ती त्यांना घेऊन गेली…
     जाणार्या गाडीकडे बघत अण्णा त्या पुण्याच्या व्यक्तीला म्हणाला, “आणि तुम्ही तुमच्या घरातले कचर्याचे डबे, भंगारात टाकायला निघालायतं, कालाय तस्मै नम:!”

Anna ashtekar 54

54– अण्णा अष्टेकर, पुर्णतः काल्पनिक, ® at fwa,71021072, ©मकरंद बेहेरे, एखाद्याचा sense of humer, किंवा उपहास काय असावा बघायच असेल तर मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अण्णा…..

…..अण्णा कोकणातून आलेला, तसं म्हटलं तर आमच्या चाळीत तो उपराच, पण लहानपणा पासुनच सगळ्या महादेव निवासला त्याने आपलसं केलेल….त्यामुळे त्याच्यासाठी परका हा शब्द उरलाच नव्हता…..

…..भसाड्या सुळेची आई म्हणजे महादेव निवासमधला एक अध्याय होता, ही बाई म्हणजे प्रत्येक चाळीतली एखादी काकी किंवा मामी या प्रकारातली होती, चाळ तिच्यामागून दहा तोंडाने बोलत असेल, पण तोंडावर “म्रुदुंग मुख लेपेन” या म्हणी प्रमाणे वागायची, परत तिच्याशी भांडण करायची किंवा वाकड घ्यायची कुणाची काय बिशाद, सगळ्या दुर्गुणांच कोठार होती ती, आणि अण्णाच बिर्हाड तिच्या बाजूला, शेजार्या पाजार्यांसकट सगळ्या चाळीला उपद्रव होता तिचा, आणि परत ती करणी, जादूटोणा करते हे  विशेषण तोंडी लावणं होतच

…..ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा भारतात रामसे बंधुंचे चित्रपट भयपट म्हणून गणले जात होते…..

…..कधी कुणाशी पटायचं नाही, सुरुवात व्हायची स्वतःच्या घरातला केरकचरा  गुंतवळासकट अशी बाहेर फेकायची की तो दुसर्याच्या घरात उडून गेलाच पाहिजे, दुसर्याच्या अंगणातली बागेची हद्द पाकिस्तानसारखी ओलांडायची आणि दुसर्याच्या सिताफळ पेरुच्या झाडावर आपला हक्क गाजवायची, चाळीच्या सार्वजनिक नळावर तासंतास जागा अडवून ठेवायची, नवरात्रात तिच्या अंगणासमोर कोणताही कार्यक्रम होऊ नये म्हणून एकदा तरी नडून राडा करायचीच, चाळी मधल्या कुणाचा शाळेत पहिला नंबर आला की हीचा असा जळफळाट व्हायचा की खाडकन दार लावून निषेध व्यक्त करायची, एखाद्या सवाष्ण परितक्त्येला कोणी हळदी कुंकवाला बोलावलं की हीचा प्रश्न असायचा “ती तुम्हाला सवाष्ण चालते कशी?”, क्रिकेट खेळताना खेळताना एखाद्याने मारलेला बॉल तिच्या घरी गेला की दोन शकल होऊन परत मिळायचा, नाना कुटावण्या होत्या तिच्या, अण्णाच्या बिर्हाडाला सर्वात जास्त त्रास होता तिचा, अण्णाच्या घरचे मूग गिळून गप्प बसायचे, पण “सखी शेजारीणी तू हसत रहा, हास्यात फळे गुंफित रहा” असे शेलके उपदेश करत रहायचा, तिला न घाबरता शाब्दिक चिमटे काढत रहायचा त्यामुळे ती अण्णाला वचकून होती पण त्यामुळे चाळीचा मधून मधून टाईमपास व्हायचा, पण माणसाच्या सहनशिलतेला पण एक मर्यादा असते आणि ती कधीतरी ओलांडली जाते, आणि झालं ही तसंच…..  

……अण्णा हरहुन्नरी आहे हे तुम्हालाही माहित्ये, आणि हीच्या घरातले सगळे “ढ” तुकडीतले हे प्रमुख कारण अण्णा आणि इतरांवर खार खायचं…..

 एका दिवाळीतली गोष्ट, लक्ष्मीपुजनाच्या दिवशी चाळीत एक रांगोळीची स्पर्धा ठेवली गेली प्रत्येकाने आपापल्या अंगणात रांगोळी काढायची आणि ज्या कोणाची रांगोळी उत्क्रुष्ट असेल त्याला बक्षिस दिले जाईल, सगळ्यांनी रांगोळ्या काढल्या, महादेवनिवास मधल्या सोकॉल्ड कमर्शिअल आर्टीस्टने परिक्षण केले आणि रिझल्ट लावला आणि अण्णाचा पहिला नंबर आला, पण याचा परिपाक असा झाला की सुळेच्या आईने असुयेने अण्णाच्या रांगोळीवर पाणी ओतलं ते असं की ओतल स्वतःच्या अंगणात पण अण्णाची रांगोळी भिजली पाहिजे, झालं चाळीला वाटलं लक्ष्मीपुजन साग्रसंगीत साजरं होतयं पण तसं काही झालं नाही….

…..दुसरा दिवस उजाडला चाळ अदमास घेतच होती , आणि चाळीला फराळ मिळाला, सुळेची आई न्हाउन अर्धवट पिकलेले केस सुकवायला बाहेर आली हिरवं लुगडं आणि लाल चोळी घालून, आणि अण्णाने चाळीच्या मनात खदखदत असलेला पंच मारला की तो ऐकुन म्हातारी चरफडत आत गेली…..

…..अरे मक्या परवाच मला रामसे ब्रदर्सचा फोन आला म्हणत होते, “नविन पिक्चर काढतोय, नविन लोकेशन हवय”, म्हटलं “आहे, आमचीच मोडकळीला आलेली चाळ, आणि त्यावर एक हडळ मोफत!”

Anna ashtekar 58

58– अण्णा अष्टेकर, पुर्णतः काल्पनिक, ® at fwa, 7102403, © मकरंद बेहेरे, 

परवा बरेच दिवसांनी अण्णा आला होता, कुटुंबासकट, मोठ्या रजेवरच होता, ४-५ दिवस काढूनच आला होता, बरेच किस्से गप्पा गोष्टी चालू होत्या कारण अण्णाचा लोक संग्रह ही तसाच आहे, आणि विषय निघाला एका सभ्य सोफेस्टीकेटेड वैदूचा, मुन्नाभाईचा, तो स्वतःला डॉक्टर म्हणवत नव्हता पण समजत असावा…..

…..तुम्हाला माहित्ये अण्णा मुंबई महानगरपालिकेत नोकरी करतो, तिथे विविध जाती धर्माचे विविध अडचणी, कामे असलेली लोकं येत असतात आपल्या विविध समस्यांच निराकरण करण्यासाठी, त्यात काही स्वयं घोषित समाजसेवकही असतात, तर असाच एक समाजसेवक अण्णाच्या ऑफिसमध्ये येत असतो खादीचा सदरा सलवार घालून, त्याने स्वातंत्रपुर्व चळवळीतील एका सुप्रसिध्द आणि नंतरच्या काळातील नगरसेविका आमदार ह्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम केल्याच आणि त्यांनी या स्वयंघोषित समाजसेवकाला मानसपुत्र मानल्याचही सांगतो, त्याच्या एकंदर वर्तनावरून तरी असं वाटत नाही इति अण्णा, असो (इथे आपल्याला कोणाच्याही नावाशी प्रयोजन नाहीये)…..

…..तर एकदा अण्णाचा पाय मुरगळला होता आणि अण्णा तो स्वतःहून स्पर्श चिकित्सेने थांबवू शकला असता पण त्या समाजसेवक मुन्नाभाईच कार्यालयातील इतर विभागांच काम झालं आणि तो समाजसेवक अण्णाच्या विभागात आला अण्णाशी गप्पा मारायला, कारण त्याला अण्णाचा स्वभाव आवडायचा नियमात राहून आपण बरं आपलं काम बरं, तर या मुन्नाभाईला कळलं अण्णाचा पाय मुरगळलाय, तसं त्याने एक कागद घेतला आणि त्यावर आर एक्स वगैरे लिहून अगदी अँलोपाथीची औषध मलम लिहून दिलं, आणि अण्णाला उत्सुकता वाटायला लागली, नंतर नंतर त्या समाजसेवकाची टकळी इतर विषयांवरून आजार,  रोग औषध उपाययोजनेवर यायची त्यावेळी हा मुन्नाभाई अगदी सर्राईतपणे सांगायचा ” हं मग तुम्ही या अमुक आजारावर हे औषध घ्या, या रोगावर हा औषधांचा कोर्स करा इ. अण्णाला जाणवायला लागलं की त्या समाजसेवकाला अँलोपाथी, होमिओपाथी, नँचरोपाथी, अल्टरनेटीव्ह मेडीसिन, आयुर्वेद पंचकर्म, प्राणिक हिलिंग, रेकी आणि अण्णाला माहित नसलेल्या पँथींमध्येही गती असावी म्हणायला गेलं तर ७२ आजारांवरील रामबाण उपाय, अण्णाने कुतुहलापोटी एकदा त्या मुन्नाभाईला विचारलं “तुमचं वय काय?” तो उत्तरला “७२ चालू”, त्यावेळी अण्णाला तो समाजसेवक ७२ रोगांच बिढार वाटला अण्णाने त्याची ओळख झाल्यापासून मुन्नाभाईची एकंदर मॉकरी बघून त्याने मानसिक रोगांवरची काही औषधं त्याला माहित आहेत का म्हणून विचारली तसा तो म्हणाला “माहित आहेत काय म्हणून काय विचारता, मी ती रोज घेतोय!

First blog post59– अण्णा अष्टेकर, पुर्णतः काल्पनिक, ® at fwa, 71024041, © मकरंद बेहेरेही अष्टमीच्या जन्माच्या वेळची घटना आहे, अफवा कशी पसरते, गैरसमज अपसमज कसे पसरतात ह्याचं उत्तम उदाहरण बरं परत कर्ताकरविता निर्माता त्या विश्व निर्मात्यासारखा अनभिज्ञ असतो नव्हे अनेक असतात, शेवटपर्यंत गुलदस्त्यात….त्यामुळे तोंड दाबून बुक्क्याचा मार आणि नाही तो मनस्ताप सहन करावा लागतो ज्याच्याबद्दल गैरसमज पसरलाय त्याला नाहक, प्रत्यक्षात मुळ घटनेचा विपर्यास असतो…..की कोणी हेतूपुरस्सर करतं का काही माहीत……अष्टमीचा जन्म एका नवरात्रातल्या अष्टमीचा….त्यामुळे वहिनीला जसे परत न येणारे दिवस गेले तसं पंचक्रोशीतल्या बायकांचे तर्क वितर्क सुरु झाले नेहमी प्रमाणे की मुलगा असेल का मुलगी इ आणि बरच काही, ती जेव्हा आमच्याकडे येई तेव्हा तीला पाहिल्यावर, आणि ती वेळ जवळ आली प्रसुतीची तीचं माहेर दादरच असल्याने तीला दादरच्या डेगवेकरांच्या प्रसिध्द प्रसुती ग्रुहात दाखलं केलं, सगळ अगदी नैसर्गिक पध्दतीने सुरळीत पार पडलं आणि अष्टमीचा जन्म झाला, वहिनी सारखीच सुंदर, गोरी पान, सहा पौंडाची सुद्रुढ, अण्णाला तिच्या प्रसुती वेणांची माहिती जशी कळवली गेली तसं अण्णा ऑफिसमधून सवलत घेऊन निघाला, निघण्यापूर्वी त्याने मला फोन केला मी आणि माझी सौ ही पोहोचलो एकाला एक कुणी लागलं तर मदतीसाठी, रुग्णालयात वहिनी आणि बाळ सुखरूप होतं, महादेव निवासची उभी बिल्डींग झाली असली तरी अजून बिल्डींगची व्रुत्ती बदललेली नाहीये. ही बातमी पसरली आणि अण्णाच्या शेजाराच्या सुळ्यांपासून सुरवात होऊन, पंचक्रोशीत पसरली आणि दुसरे शेजारी मुळ्यांपर्यंत परत येऊन पोहोचली…..सगळं स्थिर स्थावर झाल्यावर मी आणि अण्णा निघालो अण्णाने वाटेत काही किलो चांगली बर्फी घेतली आणि आम्ही घरी आलो मला आणि अण्णाला पाहिल्यावर माझ्या दरवाजाशी बायकांची गर्दी जमली नाना डोंगरेंसारखे प्रभूती ही होते तसा अण्णाने आणलेल्या मिठाईचा नैवेद्य देवाला दाखवला आणि तो आनंदाने सगळ्याना मिठाई वाटू लागला. पण सगळ्यांच्या चेहर्यावर सोयर्यात सुतकी अवकळा होती आणि ती बदलायला तयार नव्हती, काहींचे पदर डोळ्याला गेले, आणि सुळेंच्या हडळीने तर रडत खांद्यावर हात ठेवला अण्णाच्या आणि म्हणाली “अण्णा झालं ते वाईट झालं रे!” आम्हाला क्षणभर काही कळलंच नाही काय झालयं ते, आणि नंतर कळलं ते एकून आम्हाला कपाळावर हात मारुन घेण्याशिवाय पर्याय उरला नाही…..आणि त्या आफवेचा एक एक निर्माता बोलु लागला!एक: अरे सगळ सुरळीत होईल असं वाटलं ना पण वहिनीची स्थिती बिकट झाली होती ना?दोन:अरे बाळ मेलेलं जन्माला आलं ना?तीन: जन्मतःच ते काळं ठिक्कर पडलं होतं ना?चार: पण तु त्याला हातात घेतलस आणि तुला त्याची करंगळी हलताना दिसली ना मग तू तस डॉक्टरांना सांगीतलसपाच: पण डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत.सहा: नशीब वहिनी वाचली…..इ….इ.

This is the post excerpt.

This is your very first post. Click the Edit link to modify or delete it, or anna ashtekar. If you like, use this post to tell readers why you started this blog and what you plan to do with it.