anna ashtekar 50

50 -अण्णा अष्टेकर, (पुर्णत: काल्पनिक), ® at fwa, ६१०२०१३१, © मकरंद बेहेरे,  काल परवाच नवरात्र होऊन गेलय, त्यामुळे माझ्या महादेव निवासमधील नवरात्रीच्या आठवणी जाग्या झाल्या, आमचे ग्रामदैवत शिवदेवी, नवसाला पावणारी, तिचा उत्सव धुमधडाक्यात साजरा व्हायचा, आडव्या महादेव निवासच उभ्या बिल्डींगमधे रुपांतर होईपर्यंत हा धुमधडाका चालू असायचा, पण जशी बिल्डींग झाली, तशी उत्सवाची रया गेली, आमच्या आडव्या महादेव निवाससमोर मोकळं मैदान होतं आणि त्या मैदानाच्या एका बाजूला छोट्याश्या टेकडीवर देवीच मंदीर, घटस्थापनेचा पहिला दिवस शांततामयरित्या पार पडायचा पण नंतरचे दसर्यापर्यंतचे दिवस म्हणजे हैदोस असायचा, घटस्थापना करण्यासाठी अण्णाचे अजोबा कृष्णराव ठोसर,  आईचे वडील दरवर्षी पूजा सांगायचे, पूजा झाली की लाऊडस्पिकरवरची गाणी दिवसाचा प्रहर बदलेल तशी बदलायची, सकाळी भुपाळ्या, भक्ती गीते, मग आठ नऊ वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत नवी जुनी भावगीतं, बारा ते चार दुपारी झोपायची वेळ असल्यामुळे कर्णभंजंन थांबायचं की चार वाजल्यापासून मधुमतीतील सुहाना सफर और ये मौसम हंसी पासून सुरुवात व्हायची ते रात्र जशी चढत जायची रंबा हो हो हो सारख्या टुकार गाण्यांनी आसमंताची पकड घेतलेली असायची, मग रात्री उशिरा पर्यंत चालणारा पडदयावरच्या चित्रपटाचा खेळ सुरू व्हायचा, ‘आजचा चित्रपट’ असा फळा दुपारी चार वाजता बाहेर लागला की, येणारी जाणारी माणसं आवर्जून थांबून त्या फळ्यावरचा मजकूर वाचून पुढे जायची, मग पंचक्रोशीतील आजूबाजूच्या चाळी, वाड्या अळ्यांना खबर लागलेली असायची, आणि चित्रपटाच्यावेळी चाळीचे आवार भरून जायचे, चित्रपट पडद्याच्या दोन्ही बाजूने बघता यायचा म्हणून अमाप गर्दी व्हायची. कधी एखादा कृष्ण- धवल चित्रपट बघायला मिळायचा तर कधी ईस्टरमन, फुजीकलरमधले, कधी हिंदी तर कधी मराठी, कधी कौटुंबिक पार्श्वभूमीचे तर कधी ढिशुम ढिश्कॅव आवाज येणारे हणामारीचे चित्रपट, तर कधी फक्त गरबा असायचा, चाळीच्या आवारात गर्दी व्हायच्या आत, बायकामंडळींचा आणि बालगोपालांचा भोंडलाही व्हायचा,, आणि नंतर वेगवेगळ्या प्रकारचा प्रसादही वाटला जायचा, गरबा व्हायचा तेव्हा अनेक पोषाखात गरब्याच्या निमित्ताने  जोडी जमवून लाईन मारणे आणि लाईन सांभाळण्याचा प्रयत्न सुरू व्हायचा, साधारणतः सगळे उमेदवार जे लग्नासाठी उभे होते ते भावी काळातील आगामी चित्रपटातील हिरो हिरोईनच असावेत असे वावरायचे, पण तरीही नवरात्र झाल्यानंतर जानेवारीमध्ये कधी बातमी ऐकू आली नाही, चित्रपटाच्यावेळची तर तर्हाच वेगळी, चाळीच्या समोरच मोकळं पटांगण हे आणलेल्या गोणपाटावर, चादरी, चपला, झापांवर बसून हाऊसफुल नैसर्गिक स्टाॅलमध्ये रुपांतरीत व्हायचं, आणि आम्ही महादेव निवासचे रहिवासी मात्र वेगवेगळ्या खुर्च्या घेऊन बाल्कनीत बसल्याच्या आवेशात असायचो, मग दिलखेच अशा नृत्यांना आणि काळजाचा ठाव घेणार्या संवादांना स्टाॅलमधील हिरोंच्या जे पडद्यावर स्वतःला बघत असावेत त्यांच्या शिट्टया व स्पेशल काॅमेंट्स  ऐकू यायच्या आणि हशा पिकायचा, एखाद दिवशी जागा पटकावण्यावरुन हुल्लड व्हायची आणि एका चाळीतला स्वयंघोषीत दादा दुसर्या चाळीतल्या दादाला जो त्या लफड्यात असायचा त्याला आवाज़ द्यायचा तर कधी कोणी विनोदी व्यक्तिमत्व स्टाॅलमध्ये घुशी सोडून द्यायचं आणि स्टाॅलमधल्या हिरोंची पळापळ बघून मनोमन दिलखुलास आनंद घ्यायचं, तर कधी दुसराच राडा व्हायचा, पोलिस यायचे, चित्रपट अर्ध्यावर थांबायचा तर कधी चित्रपटाच रीळ तुटायचं, कधी पाऊस पडायचा आणि खासकरून चाळीतल्या तरुणींचा हिरमोड व्हायचा,  आमच्यासारखी काही लहान मुलं एखादा हाॅरर, किंवा मारामारीचा किंवा सुरामारीचा सीन सुरू झाला की डोळे झाकून घ्यायची आणि “पुढे काय होईल?” असा निरागस प्रश्न आजूबाजूच्या सज्ञांनांना विचारायची जणू काही आजूबाजूला बसलेले चित्रपट लेखक असावेत तर काहीजण ढिशुम ढिशुमच्या सीनला उत्सूकते पोटी जागेवर उड्या मारायला लागायचे, तर कधी पडद्यावर फुलांची झोंबाझोंबी दिसली की “म्हणजे काय?” असा बाळबोध प्रश्न आमचा असायचा, आणि सज्ञांनांना उत्तर देण कठीण व्हायचं, पण या डोळे झाकण्यामुळे आम्ही बरेच जणांच्या नेत्रपल्लवीला मुकलो होतो असं आता वाटायला लागलय, कधी कुणी चाळीतली सुरेखा चाळीतल्याच अनिकेत सक्करला बघायची, तर कधी कुणी त्रिविक्रम ओगले कुणाला राजश्री पळसुले म्हणून बघायचा,

या दरम्यान शिवदेवीला काही जण नवस बोलायला तर काही फेडायला यायचे, येणार्या भाविकांमुळे बरीच दक्षिणा जमायची, दर दिवशी देवीचा थाट काही वेगळाच असायचा, चाळीत प्रत्येक घरात नवरात्र वसलेल असायचं, घरच्या देवीबरोबर शिवदेवीलाही वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य व्हायचे, काही घरात श्री सुक्ताची आवर्तने व्हायची तर काही घरात सप्तशतीचे पाठ, काही घरात शतचंडी नवचंडीचे याग, दोन घरात अंगात यायचं, एका घरात बाई खरी की देवी खरीं असा प्रश्न पडायचा तर दुसर्या घरात विश्वास ठेवावाच लागायचा, पण या अशा “चैतन्यमय” वातावरणात सहामहीचा अभ्यास करायचा म्हणजे सत्वपरिक्षा असायची.
     या दरम्यान आमच्या चाळीत कलागुण भरपूर असल्यामुळे बाहेरच्या कलाकारांना कधी बोलवाव लागलं नाही, सुळे त्याच्या भसाड्या आवाजात आपली गाण्याची खाज भागवून घ्यायचा तर अजय सातारकर चाळीतल्या आणि बाहेरच्या महान व्यक्तिमत्वांची मिमिक्री करण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा दर विजय नागपुरकर पु.ल. देशपांडे, व.पु काळेंनंतर मीच, अशा अविर्भावात असायचा, आणि या सगळ्यांचा प्रायोजक असायचा लाॅटरीच्या तिकीटांवर करोडपती बनण्याची स्वप्ने बघणारा सुनिल माजगावकर
   सरतेशेवटी दसर्याला सुरुवात व्हायची ती पहाटे साडेपाच वाजता “मलयगीरीचा चंदन गंधित धुप तुला दाविला,” या गाण्याने, सारा परिसर भारावून जायचा, दुपारी मस्तपैकी बासुंदी पुरीचा बेत , संध्याकाळी आप्तेष्टांकडून, शेजार्यांकडून सोनं लुटणे, विसर्जन आणि रात्री त्या वर्षीचा हीट चित्रपट!
     काही दिवसांनी, वर्षांनी गणित बदलायला लागली, वर्गणी कमी जमू लागली, महागाई वाढली, मंडळाच्या जमलेल्या तुटपुंजीमध्ये उत्सव करणं जिकीरीचं होऊ लागलं, केबल टी.व्ही सारखी करमणूकीची नवी साधनं येऊ लागली, चाळ बिल्डरच्या घशात गेली, आणि महादेव निवासचा नवरात्र उत्सव ओस पडू लागला आणि एके वर्षी कायमचा बंद पडला, पण या नवरात्रौत्सवाने महादेव निवासलाच नव्हे तर अख्ख्या भारताला अनुराधा बर्वे, आणि प्रांजल कर्वे सारखे हिरो हिरोईन देऊ केेले

Advertisements

Author: rushiputra

लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, ध्वनीमुद्रक, मुक्त पत्रकार अल्बम: आरोह, लेबल: युनिव्हर्सल आॅगस्ट २०१७ काव्यसंग्रह: अभिमन्यू, अनुनिशा प्रकाशन, १७/८/२०१६

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s