Featured

First blog post59– अण्णा अष्टेकर, पुर्णतः काल्पनिक, ® at fwa, 71024041, © मकरंद बेहेरेही अष्टमीच्या जन्माच्या वेळची घटना आहे, अफवा कशी पसरते, गैरसमज अपसमज कसे पसरतात ह्याचं उत्तम उदाहरण बरं परत कर्ताकरविता निर्माता त्या विश्व निर्मात्यासारखा अनभिज्ञ असतो नव्हे अनेक असतात, शेवटपर्यंत गुलदस्त्यात….त्यामुळे तोंड दाबून बुक्क्याचा मार आणि नाही तो मनस्ताप सहन करावा लागतो ज्याच्याबद्दल गैरसमज पसरलाय त्याला नाहक, प्रत्यक्षात मुळ घटनेचा विपर्यास असतो…..की कोणी हेतूपुरस्सर करतं का काही माहीत……अष्टमीचा जन्म एका नवरात्रातल्या अष्टमीचा….त्यामुळे वहिनीला जसे परत न येणारे दिवस गेले तसं पंचक्रोशीतल्या बायकांचे तर्क वितर्क सुरु झाले नेहमी प्रमाणे की मुलगा असेल का मुलगी इ आणि बरच काही, ती जेव्हा आमच्याकडे येई तेव्हा तीला पाहिल्यावर, आणि ती वेळ जवळ आली प्रसुतीची तीचं माहेर दादरच असल्याने तीला दादरच्या डेगवेकरांच्या प्रसिध्द प्रसुती ग्रुहात दाखलं केलं, सगळ अगदी नैसर्गिक पध्दतीने सुरळीत पार पडलं आणि अष्टमीचा जन्म झाला, वहिनी सारखीच सुंदर, गोरी पान, सहा पौंडाची सुद्रुढ, अण्णाला तिच्या प्रसुती वेणांची माहिती जशी कळवली गेली तसं अण्णा ऑफिसमधून सवलत घेऊन निघाला, निघण्यापूर्वी त्याने मला फोन केला मी आणि माझी सौ ही पोहोचलो एकाला एक कुणी लागलं तर मदतीसाठी, रुग्णालयात वहिनी आणि बाळ सुखरूप होतं, महादेव निवासची उभी बिल्डींग झाली असली तरी अजून बिल्डींगची व्रुत्ती बदललेली नाहीये. ही बातमी पसरली आणि अण्णाच्या शेजाराच्या सुळ्यांपासून सुरवात होऊन, पंचक्रोशीत पसरली आणि दुसरे शेजारी मुळ्यांपर्यंत परत येऊन पोहोचली…..सगळं स्थिर स्थावर झाल्यावर मी आणि अण्णा निघालो अण्णाने वाटेत काही किलो चांगली बर्फी घेतली आणि आम्ही घरी आलो मला आणि अण्णाला पाहिल्यावर माझ्या दरवाजाशी बायकांची गर्दी जमली नाना डोंगरेंसारखे प्रभूती ही होते तसा अण्णाने आणलेल्या मिठाईचा नैवेद्य देवाला दाखवला आणि तो आनंदाने सगळ्याना मिठाई वाटू लागला. पण सगळ्यांच्या चेहर्यावर सोयर्यात सुतकी अवकळा होती आणि ती बदलायला तयार नव्हती, काहींचे पदर डोळ्याला गेले, आणि सुळेंच्या हडळीने तर रडत खांद्यावर हात ठेवला अण्णाच्या आणि म्हणाली “अण्णा झालं ते वाईट झालं रे!” आम्हाला क्षणभर काही कळलंच नाही काय झालयं ते, आणि नंतर कळलं ते एकून आम्हाला कपाळावर हात मारुन घेण्याशिवाय पर्याय उरला नाही…..आणि त्या आफवेचा एक एक निर्माता बोलु लागला!एक: अरे सगळ सुरळीत होईल असं वाटलं ना पण वहिनीची स्थिती बिकट झाली होती ना?दोन:अरे बाळ मेलेलं जन्माला आलं ना?तीन: जन्मतःच ते काळं ठिक्कर पडलं होतं ना?चार: पण तु त्याला हातात घेतलस आणि तुला त्याची करंगळी हलताना दिसली ना मग तू तस डॉक्टरांना सांगीतलसपाच: पण डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत.सहा: नशीब वहिनी वाचली…..इ….इ.

This is the post excerpt.

Advertisements

This is your very first post. Click the Edit link to modify or delete it, or anna ashtekar. If you like, use this post to tell readers why you started this blog and what you plan to do with it.

Anna ashtekar 92

92-  अण्णा अष्टेकर पुर्णतः काल्पनिक, ® at fwa 70121130, © मकरंद बेहेरे…….

…….मी अण्णाबद्दल करत असलेल्या लिखाणाची कुरकुर अण्णाला लागली होती, आणि अण्णाने ते लिखाण त्यांच्या मराठी चित्रपट सृष्टीतील एका दिग्दर्शका  मित्राला ऐकवलं की ज्याच्या नावावर दिग्दर्शक म्हणून “स्वर गेले विरूनी” आणि “सारे झोपले आकाश” सारखे दोन हिट चित्रपट होते पण तरीही तो अजून बेस्ट बसने आणि भारतीय रेल्वेने बर्याच वेळा विना तिकीट प्रवास करायचा…….

…….तर अण्णाला तो स्वत: म्हणाला की मला लेखकाला भेटायचय पण अशा ठिकाणी भेटू की जिथे माहोल बनेल मूड क्रिएट होईल, आम्हाला अर्थातच कळलं, स्थळ अर्थातच “कडूशाला…….!”

…….तर ठरल्याप्रमाणे आम्ही “फिल्म सिटी रोड” वरील एका मध्यम दर्जाच्या कडूशालेत बसलो, कारण ती जागा दिग्दर्शक साहेबांच्या घरापासून जरा जवळ होती, तर बैठक बरोब्बर संध्याकाळी सात वाजता सुरू झाली, साहेबांचा आवडता ब्रॅंड अर्थातच “खंड्या” म्हणजेच डाॅक्टर मल्यांच्या काढा, आम्ही पित नव्हतो फक्त चकना खात होतो, बर्फातले पनीर, खारे शेंगदाणे, लसूण आणि बटर मध्ये तळलेले काबुली चणे, मसाला पापड, चीज गार्लिक ब्रेड इ. सुरूवात  इंडस्ट्रीतील इकडल्या तिकडल्या गप्पांनी झाली, हा काय करतो, ती काय करते, कोणाचं कोणा बरोबर चालू आहे कोण हाजी हाजी करून कशी काम मिळवतो, अनेक विषय, पण जसा काढा शरीरात मुरू लागला, तसा साहेबांच्यात भिनलेले डाॅक्टर मल्यां बोलू लागले आणि दिग्दर्शक साहेबांनी स्क्रिनप्ले, शाॅट डिव्हीजन सकट सगळा “अण्णा अष्टेकर” आम्हाला ऐकवला, कसं कधी काय करता येईल, स्केड्यूल कसं ठेवायचं, ते अगदी प्रोड्यूसर शोधण्यापर्यंत सगळं काही साहेब करणार होते कारण ते लिखाणाच्या आणि अण्णा अष्टेकर दोघांच्याही प्रेमात होते, आम्हा दोघांसमोर एक आशावादी चित्र निर्माण झालं, संध्याकाळी सात वाजता बसलेले आम्ही, बार बंद होताना रात्री दोन वाजता उठलो, तो पर्यंत साहेबांनी १४ बाटल्या रिचवल्या होत्या एकूण चकना आणि काढा मिळून काही हजारांच्या बिल झालं ते अण्णानेच दिलं,  बाहेर पडलो पानांच्या गादीवर “चार चौकोन” आणि विड्याच्या पानाची दक्षिणा साहेबांच्या हातावर ठेवली, निघताना साहेबांनी पॅंटेचे फाटके खिसे दाखवत रात्रीच्या मिटरसकट रिक्षाचं भाडं आणि हातखर्चाला काही पैसे अण्णाकडूनच घेतले आणि साहेब रिक्षाने  पसार झाले, 

……साहेब इंडस्ट्रीतील मुरलेली व्यक्ती होती की ज्यांनी स्वत:चे फाटके खिसे असूनही त्यांनी आमचं स्वप्न असलेला काही कोटीचा चित्रपट जो आम्ही मोठ्या पडद्यावर पाहू इच्छित होतो तो आम्हालाच त्यांनी आमच्या पैशांनी सात तासांत दारूच्या टेबलावर निर्माण करून दाखवला, की ज्यांच्या खिशात कडुशालेच्या बाहेर आल्यावर एक दमडीही नव्हती,

……त्यांचा हा कफल्लकपणा माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून गेला…….

…….आणि या काल्पनिक चित्रपटाचा सगळा त्रास अण्णाने माझ्यासाठी सहन केला……

anna ashtekar 89

89- अण्णा अष्टेकर (पुर्णतः काल्पनिक), ® at fwa

71028022, © मकरंद बेहेरे,

……. आणि घडले विश्वा पलिकडले……

…….अण्णा माझ्यासाठी एक अनाकलनीय, गुढ बनत चालला होता, आणि त्याची प्रचिती मला नुकत्याच झालेल्या गुरूपौर्णिमेला आली…….

…… अण्णा ज्या गुरूंकडे तबला शिकायला जात होता, ते आता अण्णा बरोबर, मोबाईलवर संपर्कात असतात, त्यांची मधून मधून बोलाचाल चालू असते, अगदी कौटुंबिक जीवनापासून ते बरेच विषय निघत असतात,  गुरूंच्या एकंदर बोलण्यावरून त्यांच एकंदर सगळं व्यवस्थित असेल असं अण्णाला वाटत होतं, पण एक वर्षापूर्वी कधीतरी त्यांच्या बोलण्यातून अण्णाला कळलं की त्यांच्या मुलाला प्रार्थमिक अवस्थेतला कर्करोग आहे, जो औषधांना, उपायांना जुमानत नव्हता, जे कधी अण्णाचे गुरू त्या अगोदर बोलले नव्हते आणि अगदी आमच्या पहिल्या भेटीतही, अण्णा त्यांना म्हणाला की त्याला माझ्याकडे घेऊन या, मला त्याला भेटायचय, तर ठरल्याप्रमाणे अण्णाचे गुरू त्यांच्या मुलाला अण्णाकडे घेऊन आले, गुरूंना वाटलं अण्णाला त्यांच्या मुलाला असंच भेटायचं असेल, पाहूणचार झाला अण्णाने त्याच्या आजाराच स्वरूप जाणून घेतलं आणि बोलता बोलता त्याचा हात हस्तांदोलनासाठी हातात घेतला आणि गुरूंचा मुलगा कळवळला आणि बेशुद्ध पडला, क्षणभर गुरूंना काही कळलच नाही आणि अण्णाने ही तसंच भासवलं आणि अण्णाचे गुरूही अचानक भंजाळल्यासारखं करायला लागले, आणि थोड्याच वेळात ते ही चक्कर येऊन जमीनीवर पडले, हे सगळं माझ्या डोळ्यासमोर, माझ्या घरी होत होतं, आणि दोघे ही दुसर्या दिवशी आगेमागे उठले, दोघांनाही असंच वाटतं होतं की ते दोघे आत्ताच झोपेतून जागे झालेत बाकी त्यांना काही आठवतंच नव्हतं, जणू काही घडलच नाही, आणि अण्णानेही त्यांना नेमकं काय झालय त्याची टोटल लागू दिली नाही, ते जेव्हा निघाले तेव्हा अण्णा त्यांना म्हणाला उपचार सुरू ठेवा डाॅक्टरचा सतत फाॅलोअप घेत राहा, आणि मला कळवत राहा, पण अण्णा दर महिन्याला मुलाची चौकशी करायचा आणि त्यातून त्याला मुलाच्या तब्येतीची कल्पना यायची, आणि गुरूंना पण आश्चर्य वाटायला लागलं की उपायांना न जुमानणारा आजार अचानक, उपायांना साथ कशी देऊ लागला, मुलाचा माईंड सेट कसा बदलू लागला हे सगळं हळूहळू घडत होतं कारण अण्णा ते दोघेही गेल्यावर मला म्हणाला, “मी काही देव नाही, मला जमतंय तेवढं मी केलयं, बघुया काय होतंय ते”, पण गुरूंना एकंदर त्या दिवशी काय घडलं असावं हे कळलं असावं, कारणं…….

……. गुरू पौर्णिमेला अण्णाचे गुरू आले आणि धाय मोकलून रडले आणि त्यांनी अण्णाला काही कल्पना येण्या अगोदरच अक्षरशः साष्टांग नमस्कार घातला, कारण आदल्या दिवशीच त्यांच्या मुलाचा रिपोर्ट आला होता आणि गुरूंच्या मुलाचा कर्करोग पुर्णतः बरा झाला होता, 

…….आणि अण्णा त्याच्याच गुरूंच्या कधीकाळच्या वक्तव्यानुसार आज गुरुच्या एक पाऊल पुढे होता…….

anna ashtekar 91

91– अण्णा अष्टेकर (पुर्णतः काल्पनिक), ® at fwa 71029011, © मकरंद बेहेरे…….

…….आज मी अण्णाला   काय अप्पा व्हिडिओ वरून चिंटू पाटणकर, आणि बंड्या बाळ यांचा किस्सा सांगितला आणि तिकडून अण्णा कपाळावर हात मारत म्हणाला दोघेही आपापल्या बापांचे कित्ते गिरवताहेत, त्याला हसू आवरत नव्हतं…….

…….आता तुम्हाला माहित आहेच की गोट्या पाटणकर कसा होता आणि बाळू बाळ, त्यामुळे त्यांचे अनुवांशिक गुण चिंटू आणि बंड्या मध्ये उतरणे स्वाभाविक आहे, त्यातून दुग्धशर्करा योग असा की चिंटू आणि बंड्या एकमेकांचे घनिष्ठ मित्र, अगदी शाळेपासून अगदी आत्ता पर्यंत ज्युनिअर कॉलेजलासुध्दा, एकाने केलेल्या कृत्याबाबत दोघे एकत्र सजा भोगणारे, आज त्यांना काॅलेजमधून कायमचं घरी पाठवलं होतं…….

…….नुकताच सहामाही परीक्षेचा निकाल लागला होता आणि दोघे बारावीला असूनही अर्ध्या अधिक विषयांत नापास झाले होते. म्हणून घरच्यांना पाचारण करण्यात आलं, आणि सज्जड दम देण्यात आला आधीच यांच्या कारनाम्याने काॅलेज हैराण होतं याचं पर्यवसान असं झालं की, घरच्यांनी दोघांना गीर्वाण भाषेच्या अभिषेकात पोकळ वेळूने साग्रसंगीत ताडण केलं, गप्प बसतील ते चिंटू आणि बंड्या कसले त्यांनी  मुख्याध्यापकांचा बदला घेण्यासाठी त्यांच्या खुर्चीखाली सुतळीबाॅंबचा टाईमबाॅंब लावला, सगळं काॅलेज हादरलं, सीसीटिव्हींनी तोंड उघडलं, आता शेवटची ताकीद देण्यासाठी परत घरच्यांना सस्नेह निमंत्रण देण्यात आलं, घरच्यांनी दोघांपुढे हात जोडले, पण एवढा बाॅंबस्फोट करूनही मुख्याध्यापक शाबुत आहेत हे काही दोघांना सहन होईना, परत दोन तीन दिवसांनी, जवळच असलेल्या चित्रपटगृहावरील लावलेलं एक विचित्रपटाच पोस्टर यांनी सकाळी पाच वाजता कट टू कट फाडलं आणि काॅलेजच्या गेटवर लावलं आणि वरती लिहिलं आज सकाळी ११ वाजता……., बस् मग काय सीसीटीव्हीने लाल शेर्याच सर्टिफिकेट हातात दिलं…….

anna ashtekar 83

83 –अण्णा अष्टेकर, (पुर्णतः काल्पनिक), ® at fwa  71026022, © मकरंद बेहेरे,

……. आणि त्यामुळे अण्णाला, पश्चात्ताप झाला…….

…….तुम्हाला माहित्येय डाॅक्टर  दारुवाला उर्फ अशिष पुरोहित, दारू पिऊन भविष्य सांगतो, तर अण्णा आज मित्रत्वाच्या नात्याने एका नवविवाहित जोडप्याला डाॅक्टर दारूवालाकडे घेऊन गेला, अण्णाने त्याला जोडप्याला बरंच खोदून विचारलं की काय प्राॅब्लेम्स आहेत पण पहिल्या संवादापासून जेव्हा त्या जोडप्याने अण्णाला गळ घातली की आम्हाला कुणाही निष्णात ज्योतिषाशी भेट घालून दे, तेव्हापासून ते जोडप अण्णाला काही सांगायला तयार नव्हतं, की आम्ही जे काही सांगायचय ते त्या ज्योतिषाला सांगू, पण सगळं विसरून अण्णा दोघांनाही आशिष पुरोहितकडे घेऊन गेला…….नेहमीच्या मधुशालेत…….

……. दोघेही आय.टी  सेक्टरमध्ये, मुलाला वार्षिक २० लाखाच पॅकेज तर मुलीला, १५ लाखाच, दोघंही आठवड्यातून त्यांच्या नोकरीमुळे समोरासमोर खूप कमी येतात, तर त्यांचा प्रश्न होता संतती बाबत, खरं तर तिला मुल दत्तक हवं होतं पण मुलाने हट्ट धरला स्वतःच मुल हवं, मग तिने अट घातली “चाचणी नलिका अर्भकाची” ती त्याने मान्य केली कारण तिला जीवापेक्षाही महत्वाच्या झालेल्या सोकाॅल्ड नोकरी आणि पगाराच्या हव्यासामुळे प्रसुतीपर्यंत ९ महिने आणि नंतरचे संगोपनाचे सहा महिने वेळ वाया घालवणं शक्य नव्हतं आणि प्रसुतीवेदना सहन करणं……. ही भुमिका तिने पुरोहितची तार लागेपर्यंत स्पष्ट केली…….

……डाॅक्टर दारूवाला एक एक ग्लास रिचवत त्याच्या लेव्हलपर्यंत येत होता कारण त्याला पर्याय नव्हता, आणि ते दोघेही पित होते, कारण आज बहुतांश मराठी माणसाची संस्कृती दारूमय झाली आहे, आणि अण्णा, नुसता चकना खात होता…….

…….तर दारूवालाची लेव्हल आली होती आणि त्याने विचारलं की प्रश्न काय आहे? तसं मुलगी उत्तरली की आम्हाला वेळेची आणि ग्रह तार्यांची गोळाबेरीज करून असं बाळ जन्माला घालायचय की ते आयुष्यभर सर्वार्थाने सुखी असेल, थोडक्यात तीला आधी कुंडली रचून मग त्या कुंडलीनुसार बाळ जन्माला घालायचं होतं, थोडक्यात त्या अनभिज्ञ विश्वविधात्याचं कामं तिने अण्णाला सांगीतलं होतं…….

…….काही मोजक्या जगप्रसिद्ध रेडिओलाॅजिस्ट पैकी एक  डाॅक्टर दारुवाला जागेवरून उठला त्याने, त्या दोघांना भर मधुशालेत साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाला मी डाॅक्टर असलो तरी आस्तिक आहे आणि त्यामुळे मी निसर्गाच्या चक्रात ढवळाढवळ करत नाही आणि निसर्गाविरुद्ध कसलं ही कामं करत नाही…….!

anna ashtekar 45

45- अण्णा अष्टेकर, (पुर्णत: काल्पनिक), ® at fwa ६१०२८००३, © मकरंद बेहेरे, ही गोष्ट आहे २००० सालच्या निवडणुकीची, त्यावेळी पावसाळ्यात आली होती निवडणूक, अण्णा दोन दिवस माझ्याकडेच रहायला होता त्याला धारावीच्या डांबर कंपनी एरियातील एक पोलिंग बुथ आला होता, आजूबाजूला लाकडाच्या वखारी, इंच इंच चिखल, आजूबाजूला नैसर्गिक विधीची सोय नाही, ना जेवणाखाण्याची, हे त्याने केलेले वर्णन, तो आदल्या दिवशी तिकडली सगळी व्यवस्था लावून, रात्री १२ वाजता आला होता, त्याला पी आर ओची ड्युटी आली होती आणि त्याच्या पी ओने सकाळी सहा वाजता बोलावलं होतं, त्यामुळे तो घरी आला आंघोळ वगैरे करून फ्रेश झाला, माझ्या सहचारिणीने केलेला पिठलं भात जेवला, आणि झोपी गेला, पण मला माहित होतं की त्याला झोप लागली नव्हती, आणि तो चार वाजता उठला, स्वतःच स्वतः आटोपून चालता झाला, त्याच्या आजूबाजूच्या बुथ्सवर त्याच्या आॅफीसमधील काही इतर सहकारी होते आणि त्यात होता अमीर शेख, अण्णाच्याच विभागातला, निवडणूक पुर्णत: पार पडली, सगळे सोपस्कार करून मोकळे व्हायला रात्रीचे १२ वाजले, दोघेही सायन नाक्यावर येऊन चहा प्यायले, आणि दोघेही दोन्ही दिशांना पांगले, अण्णा माझ्या घराच्या दिशेने तर अमीर साडेबाराची कर्जत लोकल पकडायला….

     तर ह्या अमीर आणि अण्णामध्ये, कार्यालयात बरेच मतभेद होते धर्मावरून, दोघे एकमेकांच्या डब्यातल जेवायचे, पण कधी वादविवाद मारामारी नव्हती, पण अाढी होती मनामध्ये आणि ती असणारच, पण तरी ही दोघे मिळून मिसळून काम करायचे, दोघांचा प्राॅब्लेम एकमेक एकत्र साॅल्व्ह करायचे….
     रात्री पाऊण वाजता दारावरची बेल वाजली, म्हणून मी दरवाजा उघडला, तर अण्णा, निवडणूकीच्या ड्युटीमुळे थकून भागून आलेला, त्याच्या पाठोपाठ अमीरचा फोन अण्णाच्या मोबाईलवर आलेला, म्हणून अण्णाने काॅल उचलला, तर अमीरची ट्रेन त्याच्या डोळ्यासमोर निघून जात होती, म्हणून जीवाचा आटापिटा करून ट्रेन पकडायला गेला आणि प्लॅटफॉर्मवरवर पडून त्याचा गुडघा फुटला होता, अण्णाने माझ्याकडे बघितलं, मी काय समजायचं ते समजलो, दोघ निघालो, सायन स्टेशनवर पोहचलो, अमीरच्या बाजुला दोन तीन लोक होती, अमीरच्या गुडघ्यातून बरच रक्त वाहिलं होत आणि तो व्हीवळत होता, त्याला त्या दोन तीन माणसांच्या मदतीने सायन स्टेशनचा रॅंप चढून वरती आणला टॅक्सीत घातला आणि सायन हाॅस्पिटलला घेऊन गेलो, वाटेत त्याच्या घरच्यांना फोन करून कळवणं गरजेच होत ते कळवलं, 
     अमीरला हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केलं, पोलिस केस होती म्हणून पोलिस आले, पंचनामा झाला, आता रक्त देणं गरजेच होतं परत आमचा मनमिळाऊ अण्णाच, तो जसा मनमिळाऊ तसं त्याचा रक्तगट सगळ्या रक्तगटात मिसळणारा, ओ+, परत अण्णा नियमित रक्तदानकरता, त्यामुळे प्रश्नच मिटला, लगेच आवश्यक ते सगळे डाॅक्टरी सोपस्कार पार पडले, एक्स रे झाला, गुडघ्याला मेजर डॅमेज झालं होतं, दोन आॅपरेशन करावी लागणार होती, कागदपत्र तयार झाली होती, आता अमीरच्या घरातले येईपर्यंत वाट बघावी लागणार होती अमीरचे घरचे वडील आणि भाऊ, सकाळच्या पहिल्या गाडीने कर्जतवरून आले, तो पर्यंत फोनवरून अमीरची ख्यालीखुशाली आम्ही कळवत होतो आता निर्णय काय तो अमीरच्या घरच्यांनी घ्यायचा होता, आम्ही कागदपत्र त्याच्या घरच्यांच्या हाती सुपूर्द केले, आणि निघालो, सहा महिन्यात अमीर पुर्णत: बरा झाला,  मधूनमधून मी आणि अण्णा त्याला बघायला जात होतो, तो पुर्णत: बरा झाल्यावर अमीर आणि त्याची आई एवढे रडले की त्याची आई अण्णाचे पाय धरायला लागली, की त्यांच रडणंच बरच काहीसं न बोलता सांगत होतं तेव्हा अण्णाने माझा एक शेर पेश केला

नसतो कुणी कधी रे हिंदू तसाच मुस्लिम
जाणून तू जगावा तो धर्म मानवाचा

anna ashtekar 09

09- अण्णा अष्टेकर, (पुर्णतः काल्पनिक), ® at fwa    ४१०२४०११, © मकरंद बेहेरे- अण्णा आणि इतर मित्रांबरोबर हरिहरेश्वरला पिकनिकला आलो आणि नोस्ताल्जिक झालो. आज जग किती जवळ आलय नाही?फेसबुकवर अमेरिकेतल्या भावाबरोबर video chat करता येतं, त्याला whats app वर जगाच्या एका कोपऱ्यातून हाता एवढ्या डिव्हाइसवरून दुसऱ्या कोपऱ्यात मेसेज पाठवता येतो. तो ही एका सेकंदात पोहोचतोपण आज पासून ३० वर्ष अगोदर स्थिती तशी नव्हती ना! हे तुम्हाला ही माहीत असेल, ट्रंकाॅलतार या सारखी किती तरी साधन माणसाच्या मदतीला धावून येत होतीअवघ्या पंचक्रोशीत एक टेलीफोन असायचा आणि तो ही कोणाच्या तरी घरी आणि त्यावरून फोन करण्यासाठी तीन रुपये मोजावे लागायचे. चाळीत तार वाला तार घेऊन आला की चाळीतल्या बायकांच्या डोळ्याला काही न जाणून घेता पदर लागलेला असायचा……. 

 ही गोष्ट आहे चाळीतल्या अष्टेकरांच्या अक्का शेवटचे श्वास घेत होत्या तेव्हाचीशुध्द होती पण काही खर नव्हतं स्मरणशक्ती आधी पासूनच गेली होतीसारखी आठवण करून द्यावी लागायची९०व्या वर्षी जरजर झालेल्या देहात मुक्ती साठी आसुसलेला आत्मा कशात गुंतून राहिला होता त्यालाच माहीत, सगळी चाळ अष्टेकरांच्या घराकडे डोळे लावून होतीअक्का जरी आमच्या चाळीत राहात होत्या तरी त्यांच बरचस बिऱ्हाड कोकणात होत त्यांना चार ही मुलगे, मोठा आमच्या चाळीत असायचा बाकीचे तिघे गावाकडे, त्यातल्या धाकट्याच्या, धाकल्या यशवंताला लग्नाला दहा वर्ष होऊन ही मुल होत नव्हत ही म्हातारीला खंत, बाकी तिघे ही आबादी आबाद होतेघराण्याला वारसदिवाळीला पणती सगळ सगळ काही होतं, त्या साठी म्हणुन म्हातारीने शंकराच्या देवळाचा उंबरा किती झिजवला नसेल देव जाणे, सोळा सोमवार पासून जितकी व्रत वैकल्य करता येईल तितकी ती करतच होती पण माणसाचा जीव कुठे गुंतला असेल आणि कोणत्या गोष्टीसाठी, ते सांगता येत नाही. पूर्वीच्या काळी मुलं जगत नव्हती त्यामुळे चाळीत काही कुटुंबात भारतीय क्रिकेटची टीम तयार होईल इतकी पैदास असायचीअसो, तर म्हातारीचा जीव कशात गुंतला होता ते पिंडाला शिवणाऱ्या कावळ्यालाच एखादवेळ माहीत असावंचाळीच वातावरण हे मुळातच कौटुंबिक असल्या मुळे एखादा देशातला मोठा राजकीय नेता गेल्यावर देशावर जशी सुतकी काळा येते तशी आमच्या चाळीवर होती, म्हातारी आत्ता मरत्ये कि नंतर ही टांगती तलवा, तिच्या समवयस्क मैत्रिणीज्या काही वर्षांनी तिला भेटायला जाणार होत्या तिच्या आजू बाजुला जमल्या होत्यालहान मुलांना दंगामस्ती करता येत नव्हती म्हणुन ती कदाचित तिच्या नावाने चरफडत असतील मनातल्या मनात, बाकीची मंडळी काही ऑफिसला निघालेली काही पोहोचलेली,आपले बेत रद्द करूनहाफ डे टाकून घरी परतलेली कारण डॉक्टर दोन तासा पूर्वी येऊन कोऱ्यामीनचे इंजेक्शन सजेस्ट करून गेले होते जे ऐन वेळेवरती कधीच मिळत नाही…………..आणि तितक्यात तार आलीआधीच सुतकी अवकळा असलेल्या वेळी आता आणखी काय ऐकायला मिळतय असं म्हणत काही पदर परत डोळ्याशी गेलेती तार नेमकी आली ती अष्टेकरांच्याच घरीसगळ्या चाळीची धाकधूक वाढायला लागली, आणि म्हातारीचा मोठा आक्काच्या कानात काहीतरी कुजबुजला तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या जरा हसल्या आणि आमचा अण्णा यशवंताच्या घरी जन्माला आला होता, मोठ्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, म्हातारी का थांबली होती ते तेव्हा कळल कारण आमचा अण्णा कुणी ही त्याच्या साठी थांबाव असाच होता आणि आहे……….